एसटीत विविध ट्रेडसाठी भरती सुरू, १२८ जागांसाठी शिकाऊ उमेदवारांची गर्दी

मार्च 4, 2022 1:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । शहरातील एसटीच्या विभागीय कार्यशाळेत ट्रेडनिहाय शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी जळगाव आगारात गुरुवारी शेकडो उमेदवार मुलांनी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजेपासून कागदपत्रांच्या तपासणीला सुरुवात करण्यात येऊन सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी सुरू होती.

st jpg webp

एसटीच्या विविध ट्रेडच्या १२८ पदांच्या भरतीसाठी गुरुवारी मुलांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यासह यवतमाळ, नाशिक, मुंबई, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतूनही मुलांनी सकाळपासूनच येथे गर्दी केली होती. कागदपत्रांची तपासणी व छाननी विभाग नियंत्रक भगवान जगनोर, यंत्र अभियंता चालक श्रावण सोनवणे, विभागीय कर्मचारी अधिकारी प्रशांत महाजन यांनी केली.

ट्रेडनिहाय भरतीची संख्या

मॅकेनिक मोटार व्हेईकल ६०, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (पत्रे कारागीर) २४, मेकॅनिकल्स ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स १३, वेल्डर २, पेंटर १, डिझेल मेकॅनिक २५, अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग १, अभियांत्रिकी पदवीधर २ अशा १२८ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. सर्वच जागांसाठी प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा आहे, असे आगार प्रशासनाने सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now