जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । नारायण सेवा संस्थान उदयपुर, जळगाव जिला अग्रवाल संघटन जळगाव, व अग्रवाल समाज शेंदुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशाल निःशुल्क दिव्यांग तपासणी, ऑपरेशन चयन व कृत्रिम हात पाय, मापन शिबिर रविवार दि. 6 मार्च 2022 ला पारस मंगल कार्यालय, पारस नगर, शेंदुर्णी येथे सकाळी 9 ते 5 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

यात दिव्यांगांसाठी निःशुल्क तपासणी करण्यात येईल. ज्याचे ऑपरेशनसाठी निवड होईल त्यांना उदयपूरला बोलावून निःशुल्क ऑपरेशन करण्यात येईल. ज्यांचे कुठल्याही दुर्घटनेत किंवा अपघातात हात, पाय कापला गेला असेल त्यांना कृत्रिम हात किंवा पाय माप घेवुन पुढिल तारखेला निःशुल्क बसवण्यात येईल. सर्व दिव्यांगांनी शिबीरात येतांना आपले आधार कार्डची कॉपी, 2 पासपोर्ट फोटो ज्यात दिव्यांगता दिसेल असे व दिव्यांगाचा सरकारी दाखला सोबत आणणे जरुरी आहे. उदयपूर ची नारायण सेवा संस्था ही दिव्यांगांसाठी काम करणारी अंतरराष्ट्रीय संस्था आहे. त्याचे संस्थापक महामानव कैलाशजी अग्रवाल आहे. व संस्था अध्यक्ष प्रशांतजी अग्रवाल हे आहेत.

या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आयोजकांतर्फे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत जळगाव जिला अग्रवाल संघटनेचे अध्यक्ष अग्रश्री मित्तल, महामंत्री डॉ.सुरेश अग्रवाल, गोविंदजी अग्रवाल, अध्यक्ष अग्रवाल समाज शेंदुर्णी, प्रोजेक्ट चेअरमन सितारामजी अग्रवाल पाचोरा, मनोज अग्रवाल शेंदुर्णी, अमित अग्रवाल जळगाव, कार्यकर्ता जतिन अग्रवाल, गणेश अग्रवाल उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अग्रवाल समाज शेंदुर्णीचे कार्यकर्ता परिश्रम घेत आहेत. या दिव्यांगांच्या ऑपरेशनसाठी ज्या लोकांना आर्थिक सहयोग द्यायचे असेल त्यांनी नारायण सेवा संस्थान उदयपूर या नावाने चेक किंवा रोख रक्कम शेंदूर्णी येथे कार्यक्रमात द्यावी, व दिव्यांगांच्या सेवेसाठी हातभार लावावा. त्यात दान राशी वर आयकर अधिनियम 1961 धारा 80जी अंतर्गत 50% आयकरात सुट मिळेल.







