जळगाव जिल्हामुक्ताईनगर
ऊसतोड मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील उमरा येथील ५५ वर्षीय वयवृद्ध मजुराने थेरोळा शिवारात कडुनिंबाच्या झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रोजी १२:३० वाजेच्या सुमारास उघडीस आली.
उमरा येथील गोकुळ प्रभु पवार (वय५५) असे मयताचे नाव असून ते थेरोळा शिवरात ऊसतोडणीसाठी कुटुंबासह आले होते. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी भाऊराव बेलदार यांच्या शेताशेजारील वनहद्दीअंतर्गत असलेल्या टेकडीवरील एका कडुनिंबाच्या झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. मृतदेह शवविच्छेदन’साठी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मृत्युचे कारण कळु शकले नसुन याबाबत पोलीसात आकस्मित मृत्युची नोंद दाखल करण्यात आली आहे.