‘जळगाव लाईव्ह’च्या पाठपुराव्यांवर खिर्डी आरोग्य केंद्र चकाचक

मार्च 2, 2022 11:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील खिर्डी येथील आरोग्य उपकेंद्रात घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. या बाबत ‘जळगाव लाईव्ह’ ने दि. २३ फेब्रुवारी रोजी बातमी प्रकाशित करून आरोग्य केंद्राचे लक्ष वेधून घेतले. अखेर आरोग्य केंद्राच्या परिसरातील उकीरड्याचे ढीगारे उचलण्यात आले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

dakhal

‘जळगाव लाईव्ह’ने प्रकाशित केलेले वृत्त!

रावेर तालुक्यातील निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत खिर्डी खु, येथील गावाची लोकसंख्या अंदाजे पाच ते सहा हजाराच्या जवळपास आहे. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र घाणीच्या साम्राज्यात व विखळ्यात पडलेल दिसून येत आहे. आरोग्य उपकेंद्रा’च्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात वस्ती असून येथील काही ग्रामस्थ आरोग्य केंद्रात गुरे, ढोरे बांधत असतात व त्याचे शेणखत व उकीरड्यांचे ढीगारे आरोग्य केंद्रात टाकत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राचेच आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाने देखील दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत असून ग्रामस्थांमधून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आरोग्य केंद्राच्या परिसरात उकीरडे साचत असल्याने त्यात डास व मच्छरांचा उपद्रव वाढू शकतो. पर्यायाने आरोग्य केंदाचेच आरोग्य धोक्यात असून ग्रामस्थांच्या आरोग्यात काय सुधारणा होईल?अशी चर्चा सर्वत्र होतांना दिसून येत आहे. आरोग्य केंद्राच्या रिक्त जागेत अनेक वर्षा पासून टाकण्यात येत असलेल्या उकीरड्याचे व कचऱ्यांचे ढीगारे साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व साथीचे आजारा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव नाकारता येणार नाही. यामुळे रोगराई निर्माण होवून अनेक प्रकारच्या रोगांना निमंत्रण देण्यात येत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला दिसून येत आहे. असे वृत्त जळगाव लाईव्ह ने प्रकाशित केले होते. त्यावर अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now