हरिओम नगर शिव मंदिरात आमदार भोळे यांच्या हस्ते महाआरती

मार्च 1, 2022 2:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । कानळदा रोड वरील हरिओम नगरातील महादेव मंदिरात आमदार भोळे यांच्या हस्ते महा-शिवरात्री निमित्त महाआरती करण्यात आली. यावेळी नगरसेविका संगिता नेरकर व राजूभाऊ मराठे, राहूल घोरपडे, देविदास बाविस्कर हे उपस्थित होते.

MAL BHOLE jpg webp

यावेळी आमदार भोळे यांचे औक्षण पुष्पा आदिवाल यांनी तर स्वागत प्रकाश नागपूरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. मराठे यांचे स्वागत हरिओम नगर मंडळाचे अध्यक्ष रविंद्र सोनार यांनी संगिता नेरकर यांचे स्वागत आशा सोनार यांनी केले. यावेळी आमदार भोळे यांनी ओपन स्पेसला कंपाऊंड व दोन हायमास्ट लेम्प लावून देण्याचे मान्य केले. परिसरातील नागरिकांच्या समस्या सुरेश आदिवाल यांनी मांडल्या.

यावेळी मंडळाचे कार्यकर्ते संतोष मोरे, अशोक सोनवणे, विकी तरडे, दिपक शिंपी, गजू कोळी, मनोज सोनी, दिव्यकुमार आदिवाल, मंथन नेवसे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सुत्रसंचलन विक्रम मोरे यांनी केले. तर आभार सुरेश आदिवाल यांनी मानले. फराळ नागापुरकर व थोरात परीवारातर्फे वाटण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now