एकनाथराव खडसेंकडे तक्रार करताच शेतकर्यांना मिळाला ट्रान्सफार्मर
जळगाव लाईव्ह न्युज | 1 मार्च 2022 | रावेर तालुक्यातील खिरोदा शेत-शिवारातील वीज कंपनीचे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने केळी बागायती धोक्यात आली होती. या संदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी दखल वीज कंपनी अधिकार्यांना सूचना केल्या व शेतकर्यास ट्रान्सफार्मर मिळाल्याने केळी बागांचे होणार नुकसान टळले आहे.
अखेर शेतकर्यांना मिळाला न्याय
खिरोदा येथील फैजपूर रस्त्यावरील शेती शिवारातील शेतकर्यांची डीपी जळाल्यामुळे फरफट होत होती. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांकडे तक्रार करूनही त्यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकर्यांनी आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे डीपी मिळण्याची मागणी केली. त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने व 20 दिवस उलटल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेण्यात आली. दोन दिवसात साहित्याची पूर्तता करून डीपी, तारांसहित, वीज जोडणी करून देण्यात आल्याने मुक्ताईनगरात जावून खडसे यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी खिरोदा येथील शेतकरी उमेश चौधरी, रोझोदा येथील शेतकरी लिलाधर झांबरे, लखीचंद नेहेते, रुपेश हडपे, केतन इंगळे, हर्षल नेहेते, डॉ.विजय धांडे व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसचे आमदार असलेल्या शिरीष चौधरी यांच्या गावातील शेतकर्यांचा प्रश्न भाजपचे पदाधिकारी असलेल्या डॉ.विजय धांडे यांनी मध्यस्थी करीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून सोडवल्यानंतर या घटनेची तालुक्यात मोठी चर्चा राहिली.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते