सैय्यद नियाजअली फॉउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

फेब्रुवारी 27, 2022 6:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । भिलपुरा येथे नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीरचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिबिराचे उद्घाटन यास्मिन युसूफ अली व आशा नारायण गुप्ता यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

shibir 1 1 jpg webp

प्रास्ताविक अयाज अली नियाज अली यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.प.सदस्य प्रताप गुलाबराव पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अयाज अली नियाज अली, असलम बाबा अशरफी, डॉ. परीमल मुजुमदार, हाजी दराब खान, हाजी नासिर अली, सय्यद जावेद हे होते. तर साई सिंधू मल्टि स्पेशालिस्ट हॉस्पिटल चे तज्ञ डॉ. शंतनू कुमार साहू (ऍनेस्थेटिक), डॉ.संदीप भारुडे (एम.बी.बी.एस.), डॉ.उमर देशमुख, डॉ. असरार अहेमद तसेच नर्सिंग स्टॉप यांनी वैद्यकीय सेवा पुरवली.

शिबिरात नाक, कान, घसा, सि.जि.,ब्लड, शुगर सह संपूर्ण शरीराची मोफत तपासणी करून रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख शफी, शेख नजीर उद्दीन, नाजीम पेंटर, शेख सलीम उद्दीन, सुरज गुप्ता, सय्यद ओवेश अली, योगेश मराठे, शेख अर्शद सय्यद शाहिद यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now