युक्रेन- रशिया युद्धात भारतीय विद्यार्थ्यांची होरपळ, चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थीनी अडकली

फेब्रुवारी 27, 2022 5:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय आम्बेसीने पत्रक काढून पोलंडकडे जाण्याच्या सूचना दिल्यानंतर जवळपास युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीनशे विद्यार्थ्यांनी अतिशय खडतर तीस किलोमिटरचा प्रवास करत पोलंडच्या बॉर्डर कडे पायीच चालून प्रवास केला असता सहा ते सात किलोमीटर बार्डरआधीच थांबवून पोलंडकडे जाण्यासाठी बंदी आणली आहे.

Ukrainian Marathi students appeal to India for help jpg webp

सदर ठिकाणची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः तीन अंश सेल्सिअस तापमान आहे. तिन दिवसापासून अंगावरच्या कपड्यावर असताना या ठिकाणी विद्यार्थी अतिशय अडचणीत आलेले आहेत भारतीय आम्बेसिसने काढलेल्या पत्रकात स्पष्ट नमूद केले असतानाही या ठिकाणी या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी अडवले जात आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे अतिशय हाल होत आहेत. होस्टेलही खाली करण्यात आल्यानंतर बँका बंद असल्याने पैसेही काढता येत नसल्याने या ठिकाणी तीन दिवसांपासून हे मुलं अन्न, पाणी विना मरण यातना सहन करत अतिशय बिकट अशा परिस्थितीत आहेत. भारत सरकारने या विद्यार्थ्यांची दखल घ्यावी अशी पालकांकडून मागणी होत आहे. या विद्यार्थ्यांमध्ये ब्राम्हणशेवगे येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर पाटील यांची भाची क्षितीजा सोनवणे ही अडकली असून सदर विद्यार्थीनी चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील मुळ रहिवासी असल्याचे कळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now