पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

फेब्रुवारी 26, 2022 5:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी २७ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी ८. ३० वाजता पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी ५ वर्षाखालील मुलांना पोलिओ प्रतिबंधक दोन थेम्ब पाजून सुरुवात होईल.

polio jpg webp

प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, महापौर जयश्री महाजन, प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किरण पाटील, जि. प. चे आरोग्याधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now