जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । दूध उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण जिल्हा सहकारी दूध संघाने गाय आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदीदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा दूध संघाची संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
इतक्या रुपयाची झाली वाढ?
गायीच्या दूध खरेदीदरात २.४५ पैसे प्रतिलिटर तर म्हशीच्या दुधात ३ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संघाच्या नवीन दरानुसार दूध उत्पादकांकडून गायीचे दूध ३० रुपये तर म्हशीचे दूध ४९ रुपये दराने खरेदी केले जाणार आहे.
१ मार्चपासून ही वाढ लागू केली जाणार आहे. सद्य:स्थितीत जळगाव जिल्हा दूध संघात दरराेज २.२५ लाख लिटर दूध संकलन हाेत आहे. दूध संघाने दूध खरेदीदरात वाढ करताना गायीच्या दूध विक्री दरातही वाढ केली आहे. गायीच्या दूध विक्री दरात २ रुपये वाढ करण्यात आली आहे. तर म्हशीच्या दूध विक्रीचे दर जैसे थे आहे.
हे देखील वाचा :