जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ विभागातील चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कारण भुसावळ येथून सुरू असलेल्या मेमू गाड्यांमधून अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांसाठी मासिक पास वितरण करण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ विभागाकडून भुसावळ विभागाला देण्यात आले. त्यानुसार आज शुक्रवारपासून (दि.२५) मासिक पास वितरण सेवा सुरू होत आहे. ही पास फक्त मेमू गाडीसाठी वापरता येणार आहे. दोन वर्षांनंतर ही सेवा सुरू होत असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळेल.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउनपासून सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉकनंतर एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र यात आरक्षण असल्याशिवाय बसण्याची परवानगी नव्हती. त्यात पॅसेंजर गाड्या बंद असल्याने चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत होती.
भुसावळ येथून काही महिन्यापूर्वीच मेमू गाड्या सुरु करण्यात आल्या. मात्र, या गाडयांना मासिक पासची सुविधा बंद असल्याने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. मासिक पास सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत होती. अशातच रेल्वेच्या वरिष्ठ विभागाकडून भुसावळ विभागाला मासिक पास वितरण सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
यानुसार आज शुक्रवारपासून जंक्शन वरील तिकिट खिडकीवर अप-डाऊन करणाऱ्यांना मासिक पास सुविधा मिळेल. मात्र, हा पास फक्त मेमू गाडीसाठी वापरता येईल. तसेच कोरोनाचे नियम पाळून दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र अथवा ७२ तास अगोदर लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागेल. दोन वर्षांनंतर ही सेवा सुरू होत असल्याने दिलासा मिळेल.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?