भारतीय शेअर बाजारात हाहाकार ! सेन्सेक्स 1700 तर निफ्टी 500 हुन अधिक अंकांनी कोसळला
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज पहाटे युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर आज गुरुवारी शेअर बाजार उघडताच ढासळला. सेन्सेक्स १७शेहून अधिक अंकांने घसरला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तब्बल ५०० हुन अधिक अंकांनी कोसळला आहे. या घसरणीत जवळपास पाच लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
मार्केट ओपनिंगमध्येच सेन्सेक्स १७५० पॉइंट तोडून ५६ हजारांवरून खाली उघडला. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 514 अंकांच्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली आणि 17 हजारांच्या खाली 16,548.90 वर उघडला. दोन्ही एक्सचेंजेसवर गुंतवणूकदारांची बंपर विक्री होताना दिसली. सकाळी 9.25 पर्यंत थोडी सुधारणा झाली होती आणि सेन्सेक्स 1,448 अंकांच्या घसरणीसह 55,743 वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टी 419 अंकांनी घसरून 16,444 वर व्यवहार करत होता.
सर्व क्षेत्र लाल चिन्हावर
बीएसई आणि एनएसईवरील सर्व क्षेत्रांमध्ये घसरण आहे. ऑटो, बँक, एफएमसीजी, ऑइल अँड गॅस, आयटी, एनर्जी आणि रियल्टी समभाग 2 ते 4 टक्क्यांनी घसरत आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही ३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. निफ्टी बँकेच्या शेअरमध्येही 4 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
आशियाई बाजारही तोट्याने उघडले
24 फेब्रुवारीला उघडलेल्या बहुतांश आशियाई बाजारांनी घसरणीसह व्यवहार सुरू केला. सिंगापूरचे शेअर बाजार 1.65 टक्के आणि जपानचे 1.12 टक्क्यांनी घसरले. याशिवाय तैवानच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये 1.18 टक्के आणि दक्षिण कोरियामध्ये 1.72 टक्के घसरण झाली. आशियाई बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय गुंतवणूकदारांवरही नक्कीच दिसून येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, युक्रेन संकटाचा दबाव जागतिक बाजारपेठेवर कायम आहे. वेगाने बदलणाऱ्या घडामोडींमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती कायम होती. पुतिन यांच्या आजच्या घोषणेने या अटकळांना पूर्णविराम मिळाला. आता पूर्व युरोपातील हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप धारण करू शकत नाही, अशी शक्यता आहे.
हे देखील वाचा :
- अनेक वर्षानंतर रोहित खेळणार रणजी ट्रॉफी; एका सामन्यासाठी त्याला किती मानधन मिळेल?
- Airtel चा डेटाशिवाय नवीन रिचार्ज प्लॅन लाँच; व्हॉइस आणि SMS साठी विशेष ऑफर
- Gold Rate : सोन्याचा दर आता नवीन उच्चांक गाठणार? सलग तिसऱ्या दिवशी भाववाढ
- सायबर फ्रॉडच्या घटनांना आळा घालण्यासाठी RBI महत्त्वपूर्ण निर्णय..
- EPFO च्या सदस्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारने केला हा मोठा बदल, जाणून घ्या काय होईल फायदा