रायसोनी महाविद्यालय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । रायसोनी महाविद्यालयाने कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभागीय आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले असून परीक्षित माळी, कार्तिक पाटील व श्रेयस अवतारे यांची बुद्धिबळ स्पर्धेत विभागीय संघासाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत एकूण ११ संघ सहभागी झाले होते.
नुकत्याच झालेल्या आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धा प.क. कोटेचा महाविध्यालय भुसावळ येथे पार पडल्या. यावेळी केतन बोरसे व श्रिनय नेवे या विद्यार्थ्यांचाही संघात समावेश होता. पुढील विभागीय स्पर्धा गोदावरी आयएमआर महाविद्यालयात होणार आहेत. स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, प्रा. रफिक शेख यांनी कौतुक केले.
- जळगावात 9वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन; कुठे आणि कधी होणार?
- एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या 1,257 जागांसाठी 23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्वपरीक्षा
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?