जळगाव जिल्हाशैक्षणिक

सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षात विविध योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आदींचा त्यात समावेश आहे. या योजनांचा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षातील प्रथम (Fresh) वर्षाचे व नुतनीकरणाचे (Renewal) अर्ज भरण्यास 28 फेब्रुवारी, 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे प्रथम (Fresh) वर्षाचे व नुतनीकरणाचे (Renewal) अर्ज 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत https://mahadbtmahait.gov.in या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर ऑनलाईन भरावेत. महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर पुन्हा शासनाकडून कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी सदरील बाब विद्यार्थ्यांचे निदर्शनास आणूस द्यावी. तसेच याबाबत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमध्ये आपले स्तरावरुन विविध माध्यमाद्वारे जनजागृती करावी. दिलेल्या विहित मुदतीपुर्वी पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहील. महाडीबीटी प्रणालीवर पात्र अनूसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहील, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

Back to top button