⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

भुसावळात बालकाचा नाल्यात पडून मृत्यू ; सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे लागला शोध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२४ । भुसावळ शहरातील खडका रोड भागात एका तीन वर्षीय बालकाचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी रात्री आठ वाजता उघडकीस आली. अरसलान उर्फ बाब बिहारी असे मृत चिमुकल्याचे नाव असून या घटनेमुळे पालिका नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या बालकाचा शोध लागला.

अरसलानचे वडिल नसरुद्दीन हे खडका रोड येथे मुजम्मिल खान यांच्याकडे भाड्याने वास्तव्यास आहे. वरच्या बाजूस घर आणि खाली दुकान आहे. रविवारी सकाळी ११ वाजता देखील तो वडिलांसोबत आला. खडका रोडवरील बिलाल कांडप मशिन या दुकानाबाहेर खेळत होता. याच ठिकाणी ३० फूट खोल व सहा फूट रुंद नाला आहे. अरसलाम हा खेळता खेळता नाल्यामध्ये पडला. अर्धा-एक तास झाला तरी अरसलान हा कुठेच आढळून न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी शोध घेतला. अखेर सोशियल मीडियावर अरसलान हरविल्याची पोस्ट वाऱ्यासारखी पसरली. मात्र रात्री उशिरापर्यंत देखील काहीच पत्ता लागला नाही.

माजी नगरसेवक आशिक खान यांच्या दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता तर अरसलान हा खेळता खेळता नाल्यात पडल्याचे दिसले. मात्र हे फुटेज तपासण्यास उशिर झाल्यामुळे या बालकाचा नाल्याच्या गाळात अड कून मृत्यू झाला होता. काही नागरिकांनी शिडी लावून ३० फुट नाल्यात उतरून रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास या बालकाचा मृतदेह बाहेर काढला