सुसाईट नोट लिहून महिलेने घेतला गळफास

फेब्रुवारी 21, 2022 4:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । जळगाव (Jalgaon) तालुक्यातील कंडारी (Kandari) येथील ४३ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. प्रमिला कैलास परदेशी (वय-४३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट आढळून आली असून त्यात नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद कले आहे. याप्रकरणी नशिराबाद (Nashirabad) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime 1 jpg webp

कंडारी येथील प्रमिला परदेशी (Pramila Pardeshi) ह्या पती व मुलासह वास्तव्याला असून त्या शिवणकाम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होत्या. दरम्यान, रविवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री घरात कुणीही नसतांना त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

आपण नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद कले आहे. या घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now