जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । यावल तालुक्यातील कोसगाव येथील ३८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. गणेश संताजी पाटील (वय ३८) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, कोसगाव येथील गणेश पाटील हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, त्याने रविवारी दुपारी राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. नातेवाईकांनी त्याला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्याचा मयत घोषीत केले.

फैजपूर पोलीसात समाधान पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.शुभम तिडके शवविच्छेदन करीत आहे. पुढील तपास हवालदार महेश वंजारी, गोकूळ तायडे करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीच्या शोरूमचे दिमाखात उद्घाटन; ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स
- रावेरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान किरकोळ दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल










