जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना पाचोरा ते मोंढाळा रस्त्यावर घडलीय. सागर विजय परदेशी (वय-२८) असे या मयताचे नाव आहे.

याबाबत असे की, पाचोरा ते मोंढाळा रस्त्यावरील म्हसोबा बाबा मंदिराजवळ दि.१९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एम.एच.१९-डी.ई.३२९६ व एम.एच.२१ – ए.ए.२५३९ या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात पाचोरा तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील सागर परदेशी याचा जागीच मृत्यू झाला. तर अंतुर्ली येथील यमराज धर्मराज पाटील, गणेश भीमराव पाटील व गोपाल हारसिंग पाटील हे तिघे जखमी झाले आहे.

जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, या अपघातातील दोन्ही दुचाकांचा खुर्दा झालेला आहे. या अपघाताबाबत पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.
हे देखील वाचा :
- जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीच्या शोरूमचे दिमाखात उद्घाटन; ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स
- रावेरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान किरकोळ दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल










