आजचा इंधन दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर
जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जाहीर केला. त्यात तब्बल १०८ दिवस देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेल दर जैसे थे आहेत. आज रविवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. तेलाच्या किमतीनी १०० डॉलरच्या समीप झेप घेतली होती. मात्र हा संघर्ष काही प्रमाणात निवळल्याने तेलाचा भाव कमी झाला आहे. देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यात दरवाढ केल्यास केंद्र सरकारला फटका बसण्याची शक्यता असल्याने आज रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही.
देशातील इतर मोठ्या देशातील दर
इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मते, महानगरांमध्ये, पेट्रोल मुंबईमध्ये सर्वात महाग आहे 109.98 रुपये प्रति लिटर आणि दिल्लीमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 95.41 रुपये आहे, तर आजही देशातील सर्वात स्वस्त पेट्रोलची विक्री केली जाते. पोर्ट ब्लेअरमध्ये 82.96 रुपये प्रति लिटर दर आहे, तर डिझेल 77.13 रुपये प्रति लिटर आहे.
आज रविवारी देशाची राजधानी दिल्लीतील इंडियन ऑइलच्या पंपावर पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे. त्याचवेळी डिझेलचा दरही 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. तेलावरील व्हॅट आणि मालवाहतुकीच्या दरामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राज्यानुसार बदलतात.
हे देखील वाचा :
- Gold Price : जळगावच्या सुवर्णबाजारात घसरणीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ
- तूरचा भाव प्रति क्विंटल 5 हजारांनी घसरला; शेतकऱ्यांना मोठा फटका
- मध्यमवर्गीयांसाठी ‘या’ आहेत पाच परफेक्ट कार; किंमतही बजेटच्या बाहेर जाणार नाही!
- सर्वसामान्यांना झटका! जळगावात सोयाबीन तेलाचा भाव पुन्हा वाढला
- सर्वसामान्यांचा खिशा होणार आणखी खाली; पेट्रोल – डिझेलसह ‘या’ वस्तू महागणार, कारण काय?