एकल कलाकार अर्थसाहाय्य निवड समिती सदस्यपदी डाॅ. बागूल

फेब्रुवारी 18, 2022 5:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । भीमरमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सार्वजनिक विद्यालय आसोदा येथील पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागूल यांची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हास्तरीय एकल कलाकार अर्थसाहाय्य निवड समितीवर सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

dr.bagule

समितीत जिल्ह्यातील कलावंत, साहित्यिकांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. समितीत प्रदीप पाटील, चंद्रकांत भंडारी, भाऊलाल पाटील, विनोद ढगे, दत्तूभाऊ सोनवणे, प्रा. डॉ. सुशील पाटील, अंकुश महाराज मनवेलकर, शिवाजीराव पाटील, सोपान कोळी यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now