⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शिल्पकलेतून “शिवरायांना” अनोखे अभिवादन!

शिल्पकलेतून “शिवरायांना” अनोखे अभिवादन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त ओजस्विनी फाईन आर्ट विभागातर्फे शिल्पकलेतून महाराजांना अभिवादन करण्यात आले. के.सी.ई सोसायटीचे मु.जे.महाविद्यालय संचालित ओजस्विनी फाईन आर्ट विभागातील (b.v.a) चित्रकला विभागातर्फे शिल्पकलेतून महाराजांना अभिवादन करण्यात आले.

शनिवार 19 फेब्रुवारी रोजी महाराजांची 392 वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त शिल्पकलेचा विद्यार्थी सागर चौधरी याने शाडू मातीपासून महारांजाची हुबेहुब व अतिशय बोलकी मूर्ती तयार केली आहे.या मूर्तीची ऊंची 2 फूट असून ती तयार करण्यासाठी साधारण अडीच ते 3 तास इतका वेळ लागला. या थीमसाठी के.सी.ई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वदोडकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
मूर्ती तयार करण्यासाठी प्रा. पियुष बडगुजर, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ, प्रा. डिगंबर शिरसाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी देवा सपकाळे, कुणाल जाधव, भूषण पाटील, रिटा घुगे, ईशा भावसार, या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी के.सी.ई सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी संदीप केदार, प्रा. केतकी सोनार, संजय जुमनाके, सुभाष तळेले आदी उपस्थित होते.


कलेतून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो
ओजस्विनी फाईन आर्ट विभागाचे विभागप्रमुख प्रा.मिलन भामरे बोलतांना म्हटले की, कलेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो त्यामुळे त्या विविध स्तरातून सादर झाल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती महाराज यांच्या कार्याचा उजाळा होऊन विद्यार्थ्यांना त्याचे महत्व लक्षात रहावे यासाठी ही थीम तयार केली. यापुढेही असे उपक्रम राबविले जाणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह