एलटीटी-गाेरखपूर एक्स्प्रेसमध्ये आजारी प्रवाशाचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । डाऊन २०१०३ एलटीटी-गाेरखपूर एक्स्प्रेसमधील एका आजारी प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१५) दुपारी घडली. उपस्टेशन मास्तर अशाेक तायडे यांच्या माहितीवरून लोहमार्ग पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद झाली.
मंगळवारी दुपारी एलटीटी-गाेरखपूर एक्स्प्रेस भुसावळ स्थानकाच्या फलाट ७ वर आली. या गाडीच्या डी-२ डब्यातील ७ नंबरच्या सीट वरील प्रवाशाची प्रकृती बिघडली. त्यामुळे गाडी जंक्शनवर येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यात प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे मृतदेह गाडीतून खाली उतरवून जळगाव येथे रवाना करण्यात आला. उपस्टेशन मास्तर अशाेक तायडे यांच्या माहितीवरून लोहमार्ग पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद झाली. मृताची ओळख पटवणे सुरू आहे. हवालदार दुर्योधन तायडे तपास करत आहेत.
हे देखील वाचा :