सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकारिणीवर चंद्रहास गुजराथी
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष डाॅ.शशी अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जळगाव येथील जनता बँकेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीत सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य पदी चोपडा पीपल्स बँकेचे विद्यमान चेअरमन चंद्रहास गुजराथी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सहकार भारतीच्या उपाध्यक्षपदी पीपल्स बँकेचे संचालक नेमीचंद जैन यांची तर सहसंघटक म्हणून गिरीश माळी यांचीही बिनविरोध निवड झाली.
बैठकीला प्रदेश अध्यक्षा डाॅ.शशी आहिरे, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप पाटील, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, प्रदेश संघटन मंत्री संजय परमाणे, प्रदेश सहसंघटन मंत्री शरद जाधव, चोपडा यांच्यासह सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी प्रदेश कार्यकारिणीवर जळगाव जिल्ह्यातून एकमेव सदस्य म्हणून चोपडा पीपल्स बँकेचे विद्यमान चेअरमन चंद्रहास गुजराथी यांच्या नावाची घोषणाे प्रदेश सहसंघटन मंत्री शरद जाधव यांनी केली. त्याला उपस्थित मान्यवरांनी सर्वानुमते मान्यता दिली. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष डाॅ.शशी अहिरे यांनी गुजराथी यांचा सत्कार केला. यांच्या नावाची घोषणाे प्रदेश सहसंघटन मंत्री शरद जाधव यांनी केली. त्याला उपस्थित मान्यवरांनी सर्वानुमते मान्यता दिली. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष डाॅ.शशी अहिरे यांनी गुजराथी यांचा सत्कार केला.
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक