⁠ 
शनिवार, जून 15, 2024

शासन आपल्या दारी उपक्रम चळवळ म्हणून राबवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयातून चळवळ म्हणून यशस्वी करावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांला देऊन “शासन आपल्या दारी” चा उपक्रम यशस्वी करावा. असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

येथील हेडगेवार नगरातील जी.एस. मंगल कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमन मित्तल होते. 

दोन महिन्यात तालुक्यातील विविध शासकीय योजनांच्या १८१८९ लाभार्थ्यांपैकी प्रातिनिधीक स्वरूपात २५७ लाभार्थ्यांना ना. पाटील व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले. लवकरच जिल्हा स्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी जाणवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन केले. सूत्रसंचालन मंडल कृषी अधिकारी किरण देसले यांनी केले. तर  आभार नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी मानले.

लाभार्थ्यांमध्ये श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, कुटुंब लाभ, जात प्रमाणपत्र, इतर प्रमाणपत्रे, पोटखराब प्रकरणांचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र आदींचा समावेश होता. पंचायत समितीच्या अंतर्गत ३०७७ लाभार्थ्यांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, नमुना ८-अ आणि विवाह प्रमाणपत्र, शबरी आवास योजना, दारिद्रयरेषेखाली प्रमाणपत्र, वैयक्तीक शोषखड्डे, गोठे बांधकाम, सिंचन विहिरी, बायोगॅस बांधकाम, वैयक्तीक शौचालय, यांचा समावेश होता. नगरपालिका अंतर्गत ४८३ योजना लाभार्थ्यांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, प्रधानमंत्री आवास योजना, दिव्यांगांना लाभ, बचतगटांना एन.ओ.सी. आदींचा समावेश होता. आरोग्य विभागामार्फत पाच लाख रूपयांपर्यंतच्या लाभासाठी आरोग्य खात्याचे गोल्डन कार्ड तर महावितरण कंपनीतर्फे ३० नवीन वीज जोडणी प्रदान करण्यात आली. कृषी विभागामार्फत फळबाग, ठिबक, यांत्रीकीकरण व आत्मागट यांचे लाभार्थी होते.

कार्यक्रमाला प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, तालुका कृषी अधिकारी प्रदीप चव्हाण, नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, पी. एम. पाटील, गजानन पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिजाबराव पाटील, नगरपालिकेचे अधिकारी संजय मिसर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया बोरसे, तालुका निबंधक विशाल ठाकूर, महावितरणचे सुनील रेवतकर, वर्ड व्हिजनचे जितेंद्र गोरे, मंडल कृषी अधिकारी किरण देसले,  मंडळ अधिकारी भरत पारधी आदींसह नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सूत्रसंचालन मंडल कृषी अधिकारी किरण देसले यांनी केले. तर आभार नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी मानले.