जळगाव जिल्हामहाराष्ट्र

गुरूच्या अस्तामुळे महिनाभर मंगलकार्यांना विराम; १५ मार्चनंतर पुन्हा धामधूम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । ज्योतिषशास्त्रींनुसार सूर्य भ्रमण करताना एखाद्या ग्रहाजवळ पोहोचल्यावर त्या ग्रहाच्या संबंधित राशीचा प्रभाव कमी करतो. यालाच त्या संबंधित ग्रहाचा अस्त होणे असेही म्हणतात. या नियमानुसार गुरू, बुध व शनी यांचा प्रभाव लग्नकार्य, वास्तुशांती, साखरपुडा, व्यापारापासून ते सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर पडणार आहे.

गुरू ग्रह : गुरू ग्रह २३ फेब्रुवारीला अस्त होईल. त्यामुळे या महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात मंगलकार्यासह शुभ कार्यांना विराम लागेल. याचा प्रभाव देशाच्या राजकारणावरही मोठा राहील. मूर्खतापूर्ण वक्तव्य व मोठ्या नेत्यांमधील चर्चा या काळात ऐकायला मिळू शकतात. ब्रह्मांडातील सर्वात मोठा ग्रह गुरू २३ फेब्रुवारीला अस्त होणार असल्याने लग्नकार्यासह इतर शुभ कार्यांना विराम मिळणार आहे. तर शनी, बुध या ग्रहांची याच महिन्यात युती होणार असल्याने या युतीचा व्यापारावर परिणाम होऊन या काळात काहीअंशी महागाई वाढणार आहे.

तर गुरू ग्रहाचा २३ फेब्रुवारी ते २० मार्च अस्त आहे. त्यामुळे १९ फेब्रुवारी ही शेवटची लग्नतारीख आहे. त्यानंतर लग्न कार्य, वास्तुशांती आदी शुभ कार्यांना बंदी राहील. या काळात साखरपुड्यासह कलशपूजन करून ग्रह प्रवेशास हरकत नसणार.

किती दिवस थांबव लागेल?
गुरूच्या अस्तामुळे महिनाभर लग्नांना विराम आहे. १९ फेब्रुवारी हा शेवटचा मुहूर्त आहे. त्यानंतर २५ मार्चपासूनच लग्नतिथींना सुरुवात होईल. यात २५, २६, २७, २८ मार्च या लग्नतिथी आहेत. एप्रिल महिन्यात १५ एप्रिलपासून लग्न समारंभ होतील.
बुध-शनीचा प्रभाव : बुध व शनी या ग्रहांच्या युतीचा अनिष्ट प्रभाव व्यापारावर पडणार आहे. या काळात महागाई वाढून मंदीचा प्रभाव जाणवू शकतो. यात खाद्यान्न महाग होऊ शकतात. हॉटेल, रेस्टॉरंटच्या व्यापारावर देखील याचा प्रभाव राहील.

हे देखील वाचा:

Related Articles

Back to top button