अहमनदगरच्या नामांतरची घोषणा.. ; आता ‘या’ नावाने ओळखले जाणार?

मे 31, 2023 5:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२३ । गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगरच्या नामांतराची मागणी होत होती. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराची घोषणा केली असून आता यापुढे अहमदनगरचं अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला आहे.

ahamadnagar 1 jpg webp

नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली. आमच्या कार्यकाळात आणि चौंडीमधील जयंतीच्या कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा केली हे आमचं भाग्य असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

यापूर्वी राज्यातील औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता अहमदनगरचं ‘अहिल्यादेवीनगर’ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीये. 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now