जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । धनादेश अनादरप्रकरणी चोपडा येथील पती-पत्नीस सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दिला. त्या दाम्पत्यांना अटक केली आहे.
चोपडा येथील राम सुंदरलाल गुजराथी व प्रितीबाला गुजराथी या दांपत्याने ओमशांती नागरी सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेतलेले आहे. या कर्जाच्या परतफेडीसाठी त्यांनी प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश पतसंस्थेला दिलेला होता. दोन्ही धनादेश न वटल्यामुळे पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेश गुजराथी यांनी त्यांच्या विरुद्ध निगोशियबल इन्स्ट्रूमेंट ऍक्टचे कलम १३८ नुसार, फौजदारी खटल दाखल केला होता. फौ.ख.नं. ९२३/०१ व १२४/०९ असे दोन खटले चोपडा न्यायालयात दाखल होते. फिर्यादी पतसंस्थेने सादर केलेले कागदपत्र तसेच साक्षीदारांचे जबाब यावरून न्यायालयाने दोघांना दोषी धरले. या प्रकरणी अमळनेर न्यायालयाचा निकाल लागताच दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांची जळगाव येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. खटल्याचे कामकाज संस्थेतर्फे अमळनेर कोर्टात ऍड. गजानन विंचूरकर यांनी पाहिले.
हे देखील वाचा :
- भयकंर! जळगावात चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविलं जीवन
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना