⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

मोठी बातमी : जळगाव मनपा मालकीचे गाळे सील करण्यास स्थगिती!

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । शहरातील जळगाव मनपाच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे मालकांकडे असलेल्या थकबाकीपोटी गाळे सील करण्याची धडक मोहीम मनपाने हाती घेतली होती. मनपाने गेल्या आठवड्यात भोईटे मार्केट सील केले होते. जळगाव महानगर गाळेधारक संघटनेकडून नगरविकास विभागाकडे याबाबत याचिका दाखल केली होती. मंगळवारी याबाबत नगरविकास मंत्री यांच्यासमोर सुनावणी आयोजित करीत पुढील आदेशापर्यंत गाळे सील करण्यास स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष शांताराम सोनवणे यांनी दिली आहे.

जळगाव शहरात मनपा मालकीचे २८ व्यापारी संकुल असून त्यात २६०८ गाळे आहेत. मनपाने केलेल्या करवाढ आणि रेडीरेकनरच्या नवीन दरामुळे अनेक वर्षापासून गाळेधारकांकडे थकबाकी आहे. मनपाने वसुली मोहीम हाती घेतल्यानंतर भरणा सुरु झाला होता. जळगाव महानगर गाळेधारक संघटनेकडून याविरुद्ध नगरविकास विभागाकडे दाद मागितली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत पाठपुरावा सुरु होता.

नगरविकास विभागाचे मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील गाळेधारकांनी पाठपुरावा केला होता. अनेकवेळा त्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. मंगळवारी याबाबत नगरविकास विभागाकडून प्रकरणासंबंधीची सुनावणी आयोजित करावी. पुढील आदेशापर्यंत प्रकरणात स्थगिती देण्यात येते असे आदेश देण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष शांताराम सोनवणे यांनी दिली आहे. तसेच जे गाळे मनपाने सील केले आहेत ते देखील उघडण्यात यावे असे नगरविकास विभागाने सांगितले असल्याचे ते म्हणाले.

हे देखील वाचा :