जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून धरणगाव चौकातील उड्डाण पुलाचे काम सध्या सुरू आहे. या उड्डाण पुलास राजमाता जिजाऊ उड्डाण पुल असे नाव द्यावे, अशी मागणी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांच्याकडे समस्त पाटील, मराठा समाज, विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर नगरसेवक प्रा. मनोज पाटील, डॉ. सुरेश पाटील, दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, नगरसेवक अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंदे, रवींद्र पाटील, गजानन पाटील, प्रा. शिवाजीराव अहिरराव, शकुंतला अहिरराव, मनीषा पाटील, वर्षा शिंदे, स्वप्निल सावंत, प्रा. आर. एस. पाटील, के. डी. पाटील, अजय पाटील, राकेश पाटील, शेखर पाटील, हेमंत पाटील, शरद पाटील, समाधान पाटील, स्वप्निल बोरसे, योगेश पाटील, एम. के. मराठे, डी. एस. पाटील, नीलेश पाटील, दीपक बाविस्कर, कुंदन पाटील, एन. डी. पाटील, भाईदास पाटील, हेमंत पाटील, राज पाटील, नीरज शिंदे, गजानन पाटील, सचिन पाटील, आर. झेड. पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






