जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । गेल्या महिन्यात पार पडलेल्या बोदवड पालिकेच्या निवडणुकीत १७ पैकी ९ जागांसह बहुमत मिळवले आहे. आता १८ फेब्रुवारीला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही धोका नको म्हणून शिवसेनेचे सर्व नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. दुसरीकडे ७ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीने तूर्त ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका ठेवली आहे.
बोदवड पालिकेत १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता पालिकेत विशेष सभा होईल. पीठासीन अधिकारी प्रांत रामसिंग सुलाने असतील. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे सर्व ९ नगरसेवक सहलीवर रवाना केले. त्यांच्यासोबत भाजप नगरसेवकाच्या मुलाची उपस्थिती असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तूर्त सईद बागवान व आनंदा पाटील या दोघांची नावे चर्चेत आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी १४ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज भरता येईल. नंतर छाननी होऊन वैध व अवैध उमेदवारांची नावे प्रसिद्ध होतील. १७ फेब्रुवारीला माघार घेता येईल. यानंतर १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता विशेष सभा होईल, त्यानंतर बोदवडला कुणाचा नगराध्यक्ष होणार हे निश्चित होणार आहे.
हे देखील वाचा :
- .. हा महालोफर माणूस ; मंत्री गुलाबराव पाटीलांची संजय राऊतांवर जोरदार टीका
- संजय राऊतांना अतिरेकी म्हणत मंत्री गिरीश महाजनांची सडकून टीका ; नेमकं काय म्हणाले वाचा..
- तेव्हा बाळासाहेबांनी अमित शाहांसाठी फोन फिरवला अन्…संजय राऊतांच्या पुस्तकातून खळबळजनक गौप्यस्फोट
- एकनाथ खडसे करणार घरवापसी? मंत्री बावनकुळेंच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचवल्या
- .. तेव्हाच अजित पवारांनी ऑफर दिली होती ; एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट