जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । गेल्या महिन्यात राज्यात कोरोनाने (Corona) पुन्हा डोखवर काढलं होते. त्यामुळे काही निर्बंध लावण्यात आले होते. परंतु आता राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत चर्चा करून राज्यातील कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर राज्यात कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे राज्यात नवे निर्बंध लावण्यात आले होते. त्यावेळी लग्न समारंभासाठी ५० लोकांना परवानगी देण्यात आली होती. तर शाळा कॉलेज बंद करण्यात आले होते. परंतु गेल्या काही दिवसापासून कोरोनाची संख्या कमी होत असल्याने शाळा कॉलेज पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
तर त्याचबरोबर सध्या थिएटरमधे 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. तर इतर कार्यक्रमाला बंधनं आहेत. लग्न समारंभांना बंधन आहेत. सभागृहाची दोन हजार लोकांची कॅपेसिटी असेल तर एक हजार लोकांना परवानगी नाही. फक्त दोनशेलाच परवानगी आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार, असून याबाबत राज्य स्तरावर चर्चा करणार असल्याचे देखील ते म्हणाले आहे. तसेच जोपर्यंत कोरोना संपत नाही. तोपर्यंत सर्वांना मास्क वापरावेच लागेल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
“कोवॅक्सिन लसीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे 15 ते 18 वयोगटालीत लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करणार आहे.
हे देखील वाचा :