राजकारण

.. म्हणून बच्चू कडूंना दोन महिन्याची शिक्षा ठोठावली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे चांगलंच महागात पडलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने यावर निर्णय देत बच्चू कडू यांना दोन महिने शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये त्यांनी मुंबईतील आपल्या फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. त्या फ्लॅटची सुमारे ४२ लाख ४६ हजार रुपये किंमत आहे.याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर बच्चू कडू यांच्या या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी सुरू होती. बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अनवये गुन्हा सिद्ध झाला आहे.

या प्रकरणी पाच वर्षांनी शुक्रवारी चांदूरबाजार येथील प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालय क्रमांक १ यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची शिक्षा आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी सरकारी वकील वानखडे यांनी बाजू मांडली.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button