पाचोराराजकारण

पाचोर्‍यात भाजपा युवा मोर्चाची आढावा बैठक संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । भारतीय जनता युवा मोर्चा ची पाचोरा येथे सोमवार रोजी अटल भाजपा कार्यालय येथे बैठक पार पडली भविष्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सह नगर परिषद निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे सूतोवाच जिल्हाध्यक्ष यांनी करून भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील उमेदवार म्हणून जि प सदस्य,पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक जे उभे असतील त्यांना मोठ्या मताधिक्क्याने कसे निवडून देता येईल यासाठी मेहनत घेऊन नियोजन करावयाचे आहे.

या बैठकीस प्रमुख मान्यवर म्हणून भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन व सोशल मीडिया प्रदेश संयोजक अमित सोळंखे सरचिटणीस गोविंद शेलार उपस्थित होते सदर बैठकीत कोविड मध्ये भाजयुमो शहर व ग्रामीण मंडळाने केलेले संपूर्ण कार्याचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांनी कौतुक केले तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप ग्रुप तयार करून शहरासह ग्रामीण भागातील तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तसेच केंद्र सरकारने जनतेसाठी आलेल्या लोककल्याणकारी योजना पोचविण्याचे काम मोठ्या प्रमाणात करावयाचे आहे. अशा सूचना यावेळी केल्या.

तसेच यावेळी अतुल देवरे यांची भाजयुमोच्या तालुका चिटणीस पदी देखील नियुक्ती करण्यात आली. तसेच भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की पाचोरा आणि भडगाव तालुक्यात येणारा काळ हा युवापर्वाचा असून आगामी निवडणुकांमध्ये युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल, त्यामुळे भाजयुमोच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांपर्यंत कसे पोहोचता येईल यासाठी भाजयुमोच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे अशा सूचना केल्या याप्रसंगी उपस्थित भाजयुमो तालुका अध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, सरचिटणीस परेश पाटील,शुभम पाटील,विजय पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

Related Articles

Back to top button