जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशात जळगावी असलेल्या मुलीला भेटण्यासाठी दुचाकीने निघालेल्या पित्याचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अनिल शांताराम चौधरी (वय – ४६) असे मयताचे नाव असून ही घटना कुऱ्हाड बुद्रुक ते म्हसास दरम्यान घडली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत अनिल चौधरी हे नामांकित पहिलवान होते. ते शेती व्यवसाय करुन गुरांचा व्यापार करीत होते. अनिल चौधरी हे मुलीची डिलेव्हरी झालेली असल्याने तिला जळगांव येथे भेटण्यासाठी जात असतांना कुऱ्हाड बु” ते म्हसास दरम्यान, त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना गावातील काही नागरिकांनी उपचारासाठी पाचोरा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मयत घोषीत केले. मयतावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयताचे पश्चात वृद्ध आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. धडक देणारा वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून घटनेप्रकरणी अज्ञात वाहन धारकाविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?
- चाळीसगाव मतदारसंघात कोणता आमदार निवडून येणार? पाहा exit Poll