जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील एका तरुणीला लॉजवर नेऊन, तिच्यासोबत शारीरक संबंध करतानाचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाइलमध्ये तयार करून तो व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे. याबाबत पीडित तरुणीच्या मामेभावासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना?
पीडित तरुणीच्या दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेच्या मामेभावाने गोड बोलून कधी तिला घरी नेऊन तर कधी फर्दापूर येथील लॉजवर नेऊन बळजबरीने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. फर्दापूर येथील लॉजवर शारीरक संबंध करतानाचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाइलमध्ये तयार केला. एवढेच नव्हे तर, तो व्हीडिओ सर्व मित्र परिवाराच्या व्हाट्अॅप ग्रुपवर व्हायरल केला. या गोष्टीची चर्चा होऊ लागताच पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या मामेभावाच्या आई-वडिलांकडे या सगळ्याचा जाब विचारला. त्यावर त्यांनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७६ (२) (एफ) (एन),३५४ (ए) (आय),५०६ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील ६१ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन लक्ष्मणराव नजन पाटील हे करीत आहेत.
हे देखील वाचा :
- इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) चा IPO बाजारात दाखल; किती रुपयांनी उघडला?
- हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन
- UI चित्रपट पाहिल्यानंतर तुमचे मन हेलावेल, पाहण्यापूर्वी नेटकरी काय म्हणताय? जाणून घ्या.
- गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट पदग्रहण सोहळा
- रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईटचा पदग्रहण सोहळा