वाणिज्य

जिओचा ग्राहकांना झटका! ‘या’ प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या, जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । देशातील नंबर वन टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी विविध आकर्षक योजना ऑफर करते. त्यांची किंमत केवळ कमीच नाही तर तुम्हाला त्यामध्ये अनेक आश्चर्यकारक फायदे देखील मिळतात. आज आम्‍ही तुम्‍हाला एक अशी बातमी सांगणार आहोत, जी ऐकून तुम्‍हाला धक्का बसेल. Jio ने आपल्या तीन जबरदस्त प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..

जिओचा 186 रुपयांचा प्लॅन
Jio एक प्रीपेड प्लॅन ऑफर करते ज्यामध्ये वापरकर्त्याला 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. तसेच, सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. या प्लानची किंमत 155 रुपयांवरून 186 रुपये करण्यात आली आहे.

जिओचा २२२ रुपयांचा प्लॅन
Jio च्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्याला 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. तसेच, या प्लानमध्ये सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. या प्लानची किंमत 186 रुपयांवरून 222 रुपये करण्यात आली आहे.

जिओचा ८९९ रुपयांचा प्लॅन
जिओ 336 दिवसांच्या वैधतेसह प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्यासाठी 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 28 दिवसांसाठी 50 SMS सुविधा मिळतात. तसेच, सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. या प्लानची किंमत ७४९ रुपयांवरून ८९९ रुपये करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button