⁠ 
सोमवार, मे 6, 2024

महिन्याच्या शेवटच्या दिवस सोने-चांदीच्या किमतीत झाला ‘हा’ बदल, तपासून घ्या आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२३ । जागतिक बाजारातील घडामोडींचा मोठा परिणाम सोने-चांदीच्या(Gold Silver Rate) किमतींवर दिसून येत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या किंमतीत ही तफावत दिसत असून सराफा बाजारात खरेदीदारांना धक्का सहन करावा लागत आहे. मात्र गेल्या आठवड्यात ६० हजारांवर गेलेला सोन्याचा दर आता ५९ हजाराच्या घरात आला आहे. Gold Silver Rate Today

जळगावातील दर काय?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोने विनाजीएसटी ५५,१०० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे. झाले. तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५९,७००रुपयावर गेला आहे. दुसरीकडे चांदीने भरारी घेतली. एक किलो चांदीचा भाव सध्या विनाजीएसटी ७४००० रुपयापर्यंत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंवर बाजार सुरु होताच सोने चांदीचा दर लाल चिन्हाने सुरु आहे. आज शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत सोने २२० रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सोने ५९,२२० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर १८४ रुपयांनी घसरून वाढून ७३,८७५ रुपयावर व्यवहार करत आहे.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.