⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | एसएसआर नेव्ही मध्ये निवड झालेल्या तरुणाचा कासोदा येथे गौरव

एसएसआर नेव्ही मध्ये निवड झालेल्या तरुणाचा कासोदा येथे गौरव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील प्रवीण शिंपी या तरुणाचा इंडीयन नेव्ही एसएसआर पोस्टमध्ये निवड होऊन ६ महिन्याची ट्रेनिंग पूर्ण करून आल्याने त्याचा येथील गोपाल पांडेमित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने जुने पोलीस स्टेशन आवारात सत्कार करण्यात आला.

कासोद्यातील प्रविण अशोक शिंपी व नयना प्रविण शिंपी यांचा मुलगा अक्षय याने वयाच्या १८ वर्षी शिक्षण करीत असताना गरुड झेप घेऊन इंडियन नेव्ही मध्ये एस.एस.आर या पदांवर यशाचे शिखर गाठत आपला ठसा उमटविला अक्षयचे वडिल प्रविण शिंपी हे पेशाने ड्रायव्हर असून गाडी चालवून व आई नयना शिंपी ह्या एका पायाने अपंग असून त्या दररोज शिलई मशिन चालवून काम करून त्यांनी आपल्या धकाधकीच्या जिवनात रात्रंदिवस मेहनत करून आपल्या गरिबीची उणीव मुलगा अक्षय व मुलगी मयुरी (इ.१२ विज्ञान) यांना येऊ दिली नाही. त्याचे परतफेड म्हणून मुलगा अक्षय याने आपल्या जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करत दहावीच्या वर्गात ९१ % गुण मळविले व १२ वि विज्ञान शाखेमध्ये ८१ % गुण मिळून त्याने एम.जे.कॉलेज येथे पुढील शिक्षण घेत असतांना इंडियन नेव्हीची परीक्षा दिली. त्यात अक्षयचे २५०० जागेवर १० हजार मुलांमध्ये सिलेक्शन झाले. त्याची ऑगस्ट २०२१ मध्ये उडीसा चिलखा येथील ट्रेंगीन सेंटर मध्ये ६ महिन्याची ट्रेनिंग सुरू असतांना अक्षयची २५०० मुलांमध्ये १७० मुलांची निवड होऊन. त्यात ९६ मुलांना दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने परेड मध्ये बहुमान मिळाला. त्यात अक्षयलाही या राजपथावर परेड करण्याचा मान मिळाला असता या परेड मध्ये तिन्ही दलाच्या जवानांनी परेड केली असून, तब्बल ९ वर्षा नंतर इंडियन नेव्ही ला प्रथम पारितोषिक मिळाले. हे सर्व करून अक्षय घरी आला असल्याचे कळल्याने, त्याचे व त्याच्या आई वडिलांचे कासोद्यातील जुने पोलिस स्टेशन आवारात गोपाल पांडेमित्र परिवार व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सर्वप्रथम भारतरत्न गाणकोकिळा लता मंगेशकर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून, मधुकर समदानी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी पांडुरंग वाणी, मधुकर समदानी, राजा मंत्री पतसंस्थेचे चेअरमन किशोर मंत्री, संजय चौधरी, नरेंद्र पाटील, ग्रा.पं.सदस्य नरेश ठाकरे, बंटी चौधरी, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील बियाणी, हरिष पटेल, बस स्थानक प्रमुख गोविंद बागुल, डॉ.अजय सोनी, सुनील समदानी, ऍड. अशोक पाटील, ऍड. जयेश पिलोरे, राजेंद्र वाणी नगावकर, शेखर पाटील वनकोठे कर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख महानंदा पाटील, सरिता मंत्री, कासोदा महिला शहर प्रमुख चित्राबाई वारे, ग्रा.पं. सदस्या अकांशा बियाणी, पत्रकार शैलेश मंत्री, राहुल मराठे जियाउद्दीन नूरुद्दीन मुल्लाजी, मुकेश पारधी, केदार सोमाणी, गजानन महाजन, गोविंद चौधरी, रंगनाथ शेठ सोनार, राजेंद्र शिंपी, गोकुळ शिंपी, बेलदार, प्रशांत पाटील, गणेश पिंगळे, कैलास अग्रवाल, केशव शेठ सोनार, विपुल पाटील, वासुदेव वारे व गोपाल पांडेमित्र परिवारासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.याकार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.किशोर पाटील यांनी तर सूत्रसंचालन केदार सोमाणी यांनी केले व आभार गोपाल पांडे यांनी मानले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह