जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । लग्नातील हळदीचा कार्यक्रम आटोपून जेवणासाठी पाळधी येथे गेलेल्या तरुणाचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडलीय. गणेश सुखदेव महाजन (वय-३०रा. द्वारका नगर, जळगाव) मयत तरूणाचे नाव असून घटनास्थवरून कारचालक कार सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी पोलीसात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.
नेमकी काय आहे घटना?
शहरातील द्वारका नगरमधील गणेश महाजन कुटुंबियांसोबत राहतो. गणेश हा महावितरण कंपनीत नोकरीला होता. द्वारका नगर परिसरात गणेशच्या मावस भावाचे लग्न असल्याने रविवारी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम होतो. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गणेश नातेवाईकांसह मोठा भाऊ, पाहणे आणि मित्र परिवार यांच्यासोबत पाळधी येथे हॉटेलात जेवणासाठी गेले.
पाळधी येथील हॉटेलमध्ये जेवण आटोपल्यानंतर गणेश हा त्याच्या मित्रासह आगोदर द्वारकानगर कडे रवाना झाले. हॉटेलपासून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर मागून भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सोबत असलेला मित्र जखमी झाला. कारचालक कार सोडून पसार झाला होतो.
अन् भावाला बसला धक्का
गणेशचा मागून येणारा मोठा भाऊ किशोर महाजन याने रस्त्यावर कोणीतरी पडलेले दिसल्याने त्याचा मदत म्हणून थांबला. परंतू दुसरे तिसरे कोणी नसून लहान भावाचा अपघात झाल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गणेशच्या अचानक जाण्याने महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. गणेशच्या पश्चात आई– वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, मोठा भाऊ वहिनी असा परिवार आहे. पाळधी पोलीसांनी कार जप्त केली आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?
- मकरसंक्रांत झाली; आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार? मोठी अपडेट समोर