जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । सुप्रीम कॉलनीतील नितीन साहित्या नगरात शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास थंड पाणी न दिल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात चौघांनी युवकाला मारहाण करून विटा फेकून मारल्या. या मारहाणीत युवक जबर जखमी झाला आहे.
राकेश रवींद्र पाटील (वय २६, रा. नितीन साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी) असे जखमी युवकाचे नाव आहे. किरण चितळे, बंटी उर्फ चोट्या, विजय मराठे व विक्की गोसावी यांनी त्याला मारहाण केली. किरण चितळे याने राकेशच्या पत्नीला थंड पाणी मागितले होते. त्यांनी थंड पाणी नसल्याचे सांगितल्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर मित्रासह परत येऊन राकेश यांना मारहाण केली. त्यांच्या आई-वडिलांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे.
जखमी झालेला राकेश पाटील.