जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । काही दिवसापूर्वी राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन (Wine in Super Market) विक्रीला परवानगी दिली. यानंतर भाजपकडून जोरदार विरोध होत असल्याचे दिसून आले. दरम्यान, यावरूनच पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील (Gulbarao Patil) यांनी विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता असून त्या ठिकाणी देखील सुपरशाॅपीमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे; परंतु यासंदर्भातील निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर मात्र भाजपाकडून विराेध केला जात आहे. महाराष्ट्रापूर्वी मध्य प्रदेशात निर्णय घेतला आहे. असे असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केवळ विराेधाला विराेध सुरू असून हे याेग्य नसल्याचा टाेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.
अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी माध्यम प्रतिनिधींशी बाेलताना पालकमंत्र्यांनी भाजपच्या भूमिकेवर टिका केली. गाेव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनाेहर पर्रिकर यांच्या मुलाला भाजपाने गाेवा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने भाजपाला पर्रिकर यांच्या त्यागाचा विसर पडल्याची टिका केली. महिलांसंदर्भात वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्याकडून अशी अपेक्षा नसल्याचे पालकमंत्री म्हणाले.
भाजपने महाराष्ट्रातील सुपरशॉपमध्ये वाईन विक्री करण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्याचा पालकमंत्र्यांनी समाचार घेतला. भाजपची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे मध्यप्रदेशात या निर्णयाला पाठिंबा, तर महाराष्ट्रात विरोध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा :
- या राशीच्या लोकांना शनिदेवांचा आशीर्वाद लाभणार ; वाचा शनिवारचे राशिभविष्य
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..