⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | दहशत पसरवणाऱ्या संशयिताची पोलिसांनी काढली धिंड

दहशत पसरवणाऱ्या संशयिताची पोलिसांनी काढली धिंड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर शहरात दमदाटी करून पैसे हिसकावणे, मारामारी करून दहशत पसरवणे अशा विविध गुन्ह्यातील एका संशयिताला अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची दहशत कमी करण्यासाठी संशयिताची न्यायालय ते छत्रपती शाहू महाराज चौकापर्यंत पोलिसांनी गुरुवारी धिंड काढली.

शुभम देशमुख (रा.संविधान चौक) असे संशयिताचे नाव आहे. याच्यावर अमळनेर पोलिस स्थानकात २३ गुन्हे दाखल आहेत. २ रोजी सांयकाळी संशयित हा शहरात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी सहकाऱ्यांच्या तीन पथकांद्वारे सापळा रचला. गलवाडे रोडवरील प्रताप मिल कम्पाउंड येथे संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले.

दरम्यान, पोलिसांना संशयित देशमुखने भिंतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. तर त्याचा दुसरा साथीदार राहुल किशोर वानखेडे (रा.लोण चारम) यास दुसऱ्या पथकाने घरून ताब्यात घेतले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह