दोन दुचाकींचा अपघात; दोन गंभीर जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथुन जवळच असलेल्या भोद खुर्द चौफुलीवर ३ रोजी दुपारी दोन दुचाकींचा अपघात झाला. त्यात दोन जण जखमी झाले. जखमींवर पिंप्री खुर्द येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.
मात्र यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल नव्हती. भोद चौफुलीवर धरणगाव, जळगाव, चावलखेडा, भोद या गावांहून येणाऱ्या वाहनांची संख्या अधित आहे. याच मार्गावर प्राथमिक व माध्यमिक शाळा देखील आहेत. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी भोद खुर्दचे सरपंच पंढरीनाथ पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात धरणगाव आणि अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला शाळांनी निवेदन दिले आहे. अनेक विद्यार्थी सायकलवर तसेच पायी शाळेत येतात. त्यामुळे गतिरोधक बसवावे, असे पिंप्री येथील आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही.एम.चौधरी, यांनी सांगितले.
हे देखील वाचा :