सायली राजपूत यांचे सेट परीक्षेत यश

फेब्रुवारी 2, 2022 5:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव येथील सायली राजेंद्रसिंग राजपूत या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी झालेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत (सेट) जैव-विज्ञान याविषयात उत्तीर्ण झाल्या आहेत.

sayli rajput

सायली यांनी जैवतंत्रज्ञान व मानसशास्त्र या दोन्ही विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्या करगाव येथील रहिवासी व वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त राजेंद्र भिमसिंग पाटील यांच्या कन्या असून सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे निवृत्त शाखा प्रबंधक भरतसिंग लुभानसिंग पाटील (वडगाव सतीचे) यांच्या स्नुषा आहेत.

दरम्यान, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी झालेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now