जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत विभागप्रमुख प्रा.अजित पंढरीनाथ चौधरी यांना एस.आर.के.विद्यापीठ, भोपाळ द्वारा इलेक्ट्रिकल विषयात नुकतीच पीएच.डी. पदवी जाहीर करण्यात आली.
प्रा.अजित चौधरी गेल्या २२ वर्षांपासून विद्युत विभागात कार्यरत असून महाविद्यालयातील विविध उपक्रम सातत्याने राबवतात. त्यासाठी पुढाकार घेतात. पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.रविकांत परदेशी, सचिव मधुलता शर्मा, शालेय समितीचे रमेश नागरानी, प्राचार्य डॉ.राहुल बारजिभे तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रा.अजित चाैधरी यांचे अभिनंदन व सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..