⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर | विहिरीत पडलेल्या बिबट्याला शेतकरीसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे मिळाले जिवदान

विहिरीत पडलेल्या बिबट्याला शेतकरीसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे मिळाले जिवदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे भक्ष्याची शिकार करताना बिबट्या विहिरीत पडला होता. त्या बिबट्या शेतकरी व गोद्री वन विभागाच्यावतीने वाचविण्यात यश आले. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे व वनविभागाच्या कर्मचारींमुळे बिबट्याला जीवदान मिळाले

याबाबत असे की, भक्ष्याची शिकार करताना बिबट्या रात्रीच्या वेळी तोंडापूर येथील मध्यम प्रकल्पाच्या बाजूला भिसन मांग याच्या शेतातील विहिरीत पडला होता. शेत करणारे कदीर शेख हे विहिरिवर पाणी काढण्यासाठी गेले असता विहिरीत पडलेला बिबट्या त्‍यांना दिसून आला. त्यानी याबाबत तात्काळ डॉ. व्हि. टी. पाटील यांना माहिती दिली. तसेच वनविभागाचे कर्मचारी शब्बीर पिंजारी यांना देखील कळविण्यात आले.

सदर माहिती वनविभागाच्‍या अधिकारींना देण्यात आली असता उपवन संरक्षक श्री. हौसिंग यांच्या आदेशावरून वनश्रेत्र पाल अमोल पंडित यांच्या पथकाने घटनास्थळी जावून विहिरीत पडलेल्या बिबट्याला शेताच्या शेजारील शेतकरी (Farmer) शफिक शेख, पी. व्हि. महाजन, वनपाल पी. बी. काळे, वनसरक्षक शब्बीर पिंजारी, मयुर पाटील, रमजान पिंजारी, दिलीप तडवी, वाचमन एकनाथ कोळी यांनी लाकडी शिडी एकमेकांना बांधून दोरीच्या साहाय्याने विहिरीत सोडली. रात्रभर विहिरीच्या कठड्यावर बसलेल्या बिबट्याच्या जवळ शिडी ठेवली. या शिडीच्‍या सहाय्याने बिबट्या वर चढून जंगलाच्या दिशेने जोरात पळ काढला. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे व वनविभागाच्या कर्मचारींमुळे बिबट्याला जीवदान मिळाले

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.