जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.डॉ. दिपेन कुमार रजक यांनी लेखन केलेल्या ‘नैसर्गिक आणि सिंथेटिक फायबर रेनफोर्स कंपोजिट्स ‘ या पुस्तकाचे प्रकाशन ता. ३१ सोमवार रोजी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्या हस्ते करण्यात आले.
अनेक विद्यार्थी हे त्यांच्या अभ्यासाठी अनेक परदेशी लेखकांच्या पुस्तकावर अवलंबून असतात. मात्र स्थानिक प्रेसमधून अशा प्रकारचे पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे ही चांगली बाब असल्याचे कौतुकोद्गार डॉ. प्रिती अग्रवाल यांनी काढले. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस स्थित्यंतर आणि अनेक बदल होताना दिसतात, कालपरत्वे विद्यार्थ्यांच्याही अपेक्षा असतात की त्यांना त्यांच्या महाविद्यालयांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे याचाच मागोवा घेवून प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक यांनी लिहिलेले हे पुस्तक विध्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक यांनी पुस्तकाची माहिती देतांना सांगितले कि, एफआरपी कंपोझिटच्या क्षेत्रात माझे स्वलिखित पुस्तक प्रकाशित झाले आहे त्यामुळे मला विश्वास आहे की “नैसर्गिक आणि सिंथेटिक फायबर रेनफोर्स कंपोजिट्स” हे पुस्तक शास्त्रज्ञ, अभियंते, शैक्षणिक कर्मचारी आणि नैसर्गिक आणि संश्लेषण प्रबलित पॉलिमर आणि कंपोझिटच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थी व सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..