जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । येथील सामाजिक कार्यकर्ते मदन रामनाथ लाठी यांचा रक्तदानच्या उपक्रमा बद्दल बद्ल महाराष्ट्र प्रदेश युवा संघटनतर्फे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. माहेश्वरी युवा संघटनचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक सारडा, प्रदेश सचिव डॉ. गोविंद मंत्री, प्रदेश आरोग्य मंत्री डॉ. मनिष दागडिया, प्रकल्पप्रमुख प्रमोद कुमार जाजू राजेश प्रोग्राम समिती, निलेश झंवर, जिल्हा अध्यक्ष रूपेश काबरा, जिल्हा सचिव कौशल मुंदड़ा यांच्या वतीने देण्यात आले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लाठी दांपत्य साधारणतः सप्टेंबर २०२० मध्ये पॉझिटिव्ह झाले होते. ऑक्टोबर मध्यानंतर सुरळीत येण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी त्यांनी आपण एक समाजाचे देणे आहे. या भावनेने जर आपण आजच्या कठीण काळात जर प्लाजमा देऊन कोणाला जीवनदान देऊ शकतो तर का नाही करावे. हां विचार मनात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पहिला प्लाजमा 7 नोवेंबर 2020 रोजी आणि दुसरा प्लाजमा 12 डिसेंबर 2020 रोजी पिंपरी चिंचवड येथील नगरपालिकेचे वायसीएम हॉस्पिटल मध्ये जाऊन दिले. तर सोलापूर येथील महेश घाडगे यांचे वडील त्याच्या तीन दिवस अगोदर चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये भरती होते. त्यांना प्लाजमाची आवश्यकता झाली दरम्यान, त्यांचा संपर्क मदन लाठीशी झाला. लाठी यांनी एकही क्षणाचा विलंब न करता वायसीएम येथे त्वरित प्लाजमा दान केले. त्यानंतर महेश घाडगे यांचे वडील आज पूर्ववत आहेत. तर रवींद्र पिंगळे हे हडपसर येथील दवाखान्यात आयसीयूमध्ये भरती होते. त्यांनाही प्लाजमाचे आवश्यकता वाटले त्यांनी लाठीशी संपर्क साधला त्याच वेळी प्लाजमा दुसरीकडून उपलब्ध करून दिला. आजही ते रवींद्र पिंगळे व्यवस्थित फिरत आहेत. असे विविध कार्य मदन लाठी यांनी आपल्या परीने सहकार्य करण्याचा प़यत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने लाठी यांनी गौरविण्यात आले.
जैन इरिगेशनचे संचालक अजित भाऊ जैन, पुणे येथील एमआय जी ग्रुपचे माजी अध्यक्ष राहुल धुत, जळगाव जिव्हा माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष ऍड. नारायण लाठी, माहेश्वरी समाजातील व विविध क्षेत्रातुन या कार्याबद्दल तसेच पुरस्कार बद्दल कौतुक अभिनंदन केले आहे.
मदन लाठी यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय
आतापर्यत रक्तदान आणी विशेष म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा ऑक्टोबर २०२१ मध्ये ७६ वा वाढदिवस आणी मदन लाठींचा ७६ वा रक्तदान ३ ऑक्टोबर रोजी केला हां एक योगायोग म्हणावा लागेल या बद्दल राष्ट्रपतींचे निजि सचिव यांनी अभिनंदन केले आहे.
मदन लाठी यांचा ७७ वा रक्तदान २ जाने २०२२ महाराष्ट्र पुलिस स्थापना दिवसाच्या दिवशीं वायसीएम हाॅस्पिटल मध्ये केला आणि त्याच दिवशीं त्यांनी पुण्यात आणी पिंपरी-चिंचवड़ परिसरातील पोलीस बंधुचा गुलाबाचे पुष्प देवुन सत्कार केला. याही उपक्रमा बद्दल मदन लाठी चे कौतुक करण्यात आले.
असाच उपक़म मदन लाठींनी आपल्या विवाह वाढदिवसाच्या दिवशीं ११ में २०२१ रोजी पिंपरी-चिंचवड़ येथील जिजामाता हाॅस्पिटल मध्ये जाऊन साधारणत: ६० डॉक्टर आणी विविध स्टाफ यांचाही श्रीफळ आणी गुलाबाचे फुल देउन सत्कार केला. असे विविध आणि आदर्श उपक्रमा बद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या रक्तदानच्या उपक्रमा बद्दल तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी १४ जुन २०१९ मध्ये कौतुक केले होते.
हे देखील वाचा :
- उद्या महायुतीचा शपथविधी? संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, जळगावातील या आमदारांचा समावेश?
- सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल; जळगावात आज प्रति ग्रॅमचा भाव किती?
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक