जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२२ । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. जळगावात देखील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यादृष्टीने आदेश पारित केलेले आहे. प्रजासत्ताक दिनी जळगाव शहरातील डी मार्टमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली असून नियमांची पायमल्ली होत असल्याचे थेट प्रक्षेपण जळगाव लाईव्हने केले होते. जळगाव लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत मनपा पथकाने त्याठिकाणी धडक दिली. नियमांचे उल्लंघन होत असल्याने मनपा प्रशासनाने डी मार्टला ५० हजाराच्या दंडाची नोटीस बजावली आहे. तसेच आदित्य फार्म येथे २७ जानेवारी रोजी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देखील नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना करीत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गर्दीच्या ठिकाणावर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करण्याऱ्या आस्थापनांवर कारवाईसाठी मनपा ऍक्शन मोडमध्ये आली आहे. जळगाव लाईव्हने देखील प्रजासत्ताक दिनी डी मार्टमध्ये उसळलेली गर्दी, नियमांचे होणारे उल्लंघन याचे थेट प्रक्षेपण केले होते. त्यानंतर लागलीच मनपा उपायुक्त श्याम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पोहचले होते. जळगाव लाईव्हने केलेल्या थेट प्रक्षेपणानंतर देखील गर्दी कायम असल्याचे पथकाच्या निर्दशनास आले होते.
उपायुक्त शाम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महापलिकेच्या पथकाने २६ जानेवारी रोजी सायंकाळी शिरसोली रोडवरील डी-मार्ट मॉलची पाहणी केली यावेळी चारशेपेक्षा जास्त ग्राहक एकाच वेळी आढळून आले. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन, चेहऱ्यावर मास्क, ग्राहक व दुकानातील कर्मचारी यांचे लसीकरण व इतर अटी शर्तीचे पालन न केल्याचे आढळून आले. आदित्य फार्म येथे दि.२७ जानेवारी रोजी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्न समारंभात ५० नागरिकांना परवानगी असतांना या समारंभात २०० नागरिक सहभागी झाले असल्याचे मनपा पथकास आढळून आले. या नागरीकांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे मास्क तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन झालेले नव्हते. यामुळे आदित्य फार्म व डि-मार्ट सुपर शॉपी यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल का करण्यांत येवु नये? प्रतिष्ठान सील का करण्यात येऊ नये? अशी नोटीस आज दि.३१ जानेवारी रोजी बाजवण्यात आली आहे. या नोटीसीचा खुलासा संबंधितांनी २४ तासात करावयाचा आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस संपन्न
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
- अक्षरयात्री साहित्य संमेलनातून जागतिक मैत्रीचा संदेश सर्वदूर जाईल – इरोशनी गलहेना
- लसूण पोहोचला ५०० रुपये किलोवर; गृहिणींचे किचन बजेट कोलमडले
- आरआरबी परीक्षार्थीसाठी भुसावळ, जळगावमार्गे १० रेल्वे गाड्या धावणार