⁠ 
शनिवार, मे 18, 2024

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : आता मोबाइलवर वाचता येणार देशाचं बजेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ (Union Budget 2022) हा १ फेब्रुवारी २०२२ ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने एक अ‍ॅप तयार केले आहे. युनियन बजेट मोबाइल अ‍ॅप असे त्याचे नाव असून, यावर तुम्हाला संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तो हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत वाचता येणार आहे.

हे देखील वाचा : केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : अर्थसंकल्पासाठी मोदी सरकारने बदलली ‘ही’ मोठी प्रथा

संसदेत सादर केल्या जाणार्‍या या अर्थसंकल्पाची सॉफ्ट कॉपी सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर सहज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी फक्त सरकारने लाँच केलेलं युनियन बजेट मोबाइल अ‍ॅप तुमच्या मोबाइलमध्ये असणे आवश्यक आहे. या अ‍ॅपवर लोकांना बजेटशी संबंधित सर्व माहिती मिळेल.

येथे क्लिक करून तुम्ही हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता.

हे देखील वाचा :